आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:शाळापूर्व तयारीसाठी समितीकडून नियोजन; 13 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू

जालना25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१३ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून त्याची पूर्व तयारीसाठी बदनापूर तालुक्यातील नुतन वसाहत सेलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली.

चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांच्या योजना, मोफत पाठ्यपुस्तक, लाभार्थी विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी गॅस खरेदी , वृक्षारोपण व संवर्धन आदि विषय समिती पूढे मुख्याध्यापक संजय हेरकर यांनी सादर केले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दाविद घोरपडे, उपाध्यक्ष योगेश जाधव, समिती सदस्य इस्माईल शेख, कावेरी सोनवणे, सविता वाघस्कर, शिक्षक नवनाथ पालोदकर, शिक्षणप्रेमी जनार्दन अंभोरे, ग्रामपंचायत सदस्य अमोल तुपे, बबलु शेख यांच्यासह उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...