आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार:इनरव्हीलतर्फे ७४ राेपट्यांची लागवड

जालना15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या जालना शहरातील इन्नरव्हील क्लबने पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक तीन जवळील खादगाव रोडवरील पारसी टेकडीवर बुधवारी ७४ रोपांची लागवड केली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक सुनील रायठठ्ठा, कुंडलिका सीना नदी पुनर्जीवन अभियानचे उमेश बजाज, उदय शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. काही दिवसातच जालन्याचे हिलस्टेशन म्हणून ही टेकडी नावारूपाला येईल असा विश्वास रायठठ्ठा यांनी व्यक्त केला. याप्रसंगी अध्यक्षा स्मिता चेचाणी, सचिव स्वाती कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख शीला रायठठ्ठा, सुनीता अग्रवाल, अलका हयातनगरकर आदींनी लिंब, करंज, हापूस आंबा, पळस, जांभूळ, वड, पिंपळ, बेल आदी रोपांची लागवड करण्यात आली. अलका हयातनगरकर यांच्यावतीने १० रोपे उपलब्ध करून देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...