आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्ष लागवड:सोयगाव देवी येथे रक्षा शेतात पुरून वृक्ष लागवड

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथील उद्योजक मधुकर सहाने यांच्या आजी सोनाबाई येडुबा सहाने यांचे गुरुवारी ८ डिसेंबर रोजी निधन झाले. दरम्यान समाजाच्या प्रचलित प्रथा परंपरेप्रमाणे मृत्यूनंतरच्या अनेक विधी असतात.याप्रमाणेच सोनाबाई सहाने यांच्या मृत्यु नंतर रुख्मनबाई, पर्यागबाई, कासाबाई या तीन मुलींनी सर्वांना एकञ करुन निर्णय घेत रक्षाविधी शेतात पुरून त्याठिकाणी वृक्ष लागवड केली आहे.

मृत्यूनंतर रक्षा जिल्हयाबाहेर घेऊन जावे लागते. ज्यामधून अनेकदा अपघात झाल्याचे ऐकिवात आहे.आजीचे संस्कार आम्हाला योग्य दिशेने घेऊन जात आहेत. मुलींच्या इच्छेप्रमाणे शेतातच रक्षाविसर्जन केले असल्याचे सहाने परिवारातर्फे सांगण्यात आले. समाजात सुधारणा करण्यासाठी काही गोष्टी ह्या स्वतः पासून सुरू करणे आवश्यक आहे. मृत्यू हा एक उत्तम संस्कार आहे. दर वर्षी भयंकर दुष्काळाच्या झळा बसलेल्या महाराष्ट्राने वृक्ष लागवड व संगोपनाचे उद्दिष्ट समोर ठेवुन सहाने परिवाराने रक्षाविधी शेतात पुरुन वृक्ष लागवड करीत त्याचे संगोपन करण्याचा निर्धार केला.

बातम्या आणखी आहेत...