आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय कृषी योजनेतून सामूहिक शेततळे आणि वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण घटकांतर्गत प्लास्टिक फिल्म पुरवठा करणाऱ्या उत्पादक कंपन्यांच्या विक्रेते व वितरकांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांनी केले आहे.
नोंदणीची प्रक्रिया १ ते १५ डिसेंबर २०२२ पर्यंत राबवण्यात येणार आहे. यासाठी प्लास्टिक फिल्म पुरवठा करणाऱ्या विक्रेते किंवा वितरकांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, मोतीबागसमोर, बचत भवन, जालना या कार्यालयास अथवा तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत येत्या १५ डिसेंबरपूर्वी नोंदणीकरिता अर्ज करावेत.
नोंदणीसाठी रिइनफोसंड एचडीपीई जाओमेम्बर आयएसआय (आयएस १५३५१:२०१५) ५०० मायक्रॉन प्लास्टिक फिल्म पुरवठा करणाऱ्या उत्पादन कंपन्यांचे विक्रेते आणि वितरकांना आवश्यक कागदपत्रे नोंदणी अर्जाबरोबर सादर करणे बंधनकारक आहे. यात फोटोसह वितरक नोंदणी अर्ज, दोन लाख रुपये बँक स्टॅम्प पेपरवरील मूळ बँक गॅरंटी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालना यांच्या नावे प्रत आणि एक झेरॉक्स प्रत, वितरकाने शंभर रुपये किमतीच्या स्टॅम्प पेपरवर नोंदणीबाबत अटी व शर्तीकरिता करारनामा, मान्यताप्राप्त उत्पादन कंपनीकडील वितरक प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त कंपनीचे राज्यस्तरीय नोंदणी प्रमाणपत्र, कंपनी प्रतिनिधीने साक्षांकित केलेली प्रत, वितरक आणि उत्पादक कंपनी यांच्यामधील करारनाम्याची साक्षांकित प्रत, वितरकाचा दुकानस्थळ किंवा जागेचा पुरावा आठ-अ, ग्रामपंचायत अथवा नगरपालिका मालमत्ता पत्रक, दुकान भाड्याने घेतले असल्यास भाडेकरार किंवा जागा मालकाचे नाव असलेला जागेचा उतारा आदी आवश्यक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.