आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या खेळाडूंची योगासन, कॅरम स्पर्धेसाठी विभागीय स्तरावर झाली निवड

वडीगोद्री11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या खेळाडूंची योगासन व कॅरम स्पर्धेसाठी विभागस्तरावर निवड झाली आहे. जालना येथील भारत शारिरीक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हास्तरीय स्पर्धा झाली.

या स्पर्धेसाठी छत्रपती शिवाजी हायस्कूल अंकुशनगर येथील १७ वर्षीय योगासने या स्पर्धेसाठी क्रिडा अधिकारी विद्यागर, गट शिक्षणाधिकारी गीता नाकाडे यांनी भेट दिली असता त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यात हिंदवी अशोकराव खोसे (प्रथम क्रमांक), श्रुती विश्वंभर मचे (द्वितीय क्रमांक), वैष्णवी सोमनाथ सागडे (तृतीय क्रमांक) यांची ( १७ वर्षीय) वयोगटात तर गायत्री शांतीलाल परासे( द्वितीय), सुजल पांडुरंग गात(तृतीय) या दोन विद्यार्थिनींची (१४ वर्षे) वयोगटा मधील योगासन स्पर्धेत (१७ वर्षीय) वयोगटात कॅरम या स्पर्धेत आदिती नानासाहेब मोटकर (द्वितीय), ज्ञानेश्वरी महादेव पिंगळे (चतुर्थ) व मुलांमध्ये ओम दीपक लिमकर (तृतीय) क्रमांक पटकावला.

विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक किशोर डावकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी चक्रधर नाटकर मार्गदर्शन करीत आहेत. या यशाबद्दल खेळाडूंचे माजी मंत्री आमदार राजेश टोपे, मनिषा टोपे, सतीश टोपे, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्यागर, गटशिक्षणाधिकारी गीता नाकाडे, अॅड. संभाजी टोपे, सुधाकर खरात, डॉ. बाबासाहेब गायकवाड, मुख्याध्यापक किशोर डावकर, पर्यवेक्षक राजकुमार काकडे, डॉ. रफिक शेख, रमाकांत वाबळे, जगन्नाथ शिंदे, यशवंत कुलकर्णी, दत्ता भापकर, सुनील ढाकरके, सुभाष सातपुते, प्रा. अरुण कुलकर्णी, प्रा. भगवान बरसाले, दिलीप नाटकर, रमेश नाईक, कृष्णा गवळी, उमेश देशमुख आदींनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...