आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय एकता:सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाची दिली शपथ..

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हयातील विविध शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालयात प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्वांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ देण्यात आली.

देशमुख महाविद्यालय भोकरदन । येथील स्व. अॅड. भाऊसाहेब देशमुख वरिष्ठ महाविद्यालयात इंदिरा गांधी व सरदार पटेल यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. विश्वास तळेकर, उपप्राचार्य एच. व्ही. नागरगोजे, प्रशासकीय अधिकारी सोपान सपकाळ, प्रा. बाबासाहेब खिल्लारे, रोषण देशमुख, सतिश दळवी, गुणरत्न मगरे, नितीन दळवी, संतोष लोखंडे, भुषण शास्त्री यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित

जिल्हाधिकारी कार्यालय जालना । जिल्हाधिकारी कार्यालयात लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस तहसिलदार संतोष गोरड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थितांना संजय चंदन यांनी ‘राष्ट्रीय एकता दिवसा’ची शपथ दिली. याप्रसंगी नायब तहसिलदार विक्रांत मोंढे, उन्हाळे, गजानन खरात आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

शाहू इंग्लिश स्कूल जालना । शहरातील चौधरी नगर येथील भिलदरी बहुउद्देशीय संस्थेचे राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिनानिमित्त प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा रेवतीताई मांटे, संस्थेचे सचिव प्रोफेसर डॉ. सुखदेव मांटे, प्राचार्या लतिका मनोज, वरूण अंबेकर, लक्ष्मी ठोकरे, मंगला नागरे, गणेश कायंदे, राजू काकड आदी उपस्थित होते. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...