आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकांना शांतता आणि जातीय सलोखा हवा आहे आणि केवळ मोजके लोकच विध्वंसक मनाचे आहेत जे षडयंत्र रचतात आणि शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना भारतीय दंड संहितेचे अधिकार देण्यात आले आहेत. कायद्याच्या कक्षेत पोलीस अशा घटकांना पायाखाली ठेचू शकतात. अशी माहिती प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली.
शनिवारी हॉटेल मधुबन येथे रोटरी क्लब ऑफ जालना मिडटाऊनच्या कार्यक्रमात पोद्दार बोलत होते. क्लबचे अध्यक्ष रो. ॲड. महेश धन्नावत, सचिव रो. प्रशांत बागडी, रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३२ चे गव्हर्नर नॉमिनी रो. डॉ. सुरेश साबू यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना पोद्दार म्हणाले, पोलिसांचे कर्तव्य केवळ पोलिस ठाण्यात बसून नाही, तर त्यांना लोकांमध्ये मिसळावे लागते, जेणेकरून सर्वसामान्य नागरिक निर्भयपणे जगू शकतील, तर गुन्हेगार सतत भीतीच्या सावटाखाली राहतील. त्यांना शांतता नको आहे,ते भित्रे आहेत आणि लोकांना त्रास देण्यासाठी गुप्तपणे युक्त्या करण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा दुष्ट हेतू हाणून पाडण्यासाठी पोलिसांना त्यांचे गुप्तचर नेटवर्क मजबूत करावे लागेल.
असे सांगून पोद्दार यांनी साथीच्या काळात बीड व अमरावती जिल्ह्यांतील पोलिसांनी केलेल्या कामांची तपशीलवार माहिती दिली. यावेळी रोटेरियन्सच्या वतीने पोद्दार यांचा सत्कार करण्यात आला. रो. सुरज गेही यांनी परिचय सांगितला. सुत्रसंचालन दिनेश छाजेड यांनी केले तर सचिव रो. प्रशांत बागडी यांनी आभार मानले. या वेळी नरेंद्र मोदी, राजकुमार दायमा, गोटू अग्रवाल, अभय करवा, शंकरराव, हरिनारायण जयस्वाल, डॉ. कैलास सचदेव, डॉ. विजय सेनानी, डॉ. संतोष भाले, धवल मिश्रीकोटकर, सागर दक्षिणी, प्रतिक नानावटी, गौरव मोदी, डॉ. प्रतिक लाहोटी, रोमीत भक्कड, विरेश बगडिया, दीपंक अग्रवाल, मधु राठी, ॲड. राजेंद्र चव्हाण, ॲड. अश्विनी धन्नावत, ॲड. बॉबी अग्रवाल, ॲड. श्वेता यादव उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.