आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचेच्या जाळ्यात:जामिनासाठी दहा हजार रुपये घेणारा पोलिस नाईक लाचेच्या जाळ्यात

जालना17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुन्ह्यात मदत करणे, जामीन मिळवून देण्यासाठी २० हजारांची मागणी करून १० हजारांची लाच स्वीकारताना पोलिस नाईक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. ही कारवाई बदनापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली. बालासाहेब मुरलीधर खवले (३६, बदनापूर, पोलिस ठाणे, जि. जालना) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तक्रारदाराला मुलाविरुद्ध बदनापूर येथे दाखल गुन्ह्यात मदत करणे व जामीन मिळवून देण्यास मदतीसाठी पोलिस नाईक खवले याने २० हजार रुपये मागितले होते. तडजोडीअंती १० हजार स्वीकारताना खवले याला एसीबीच्या पथकाने पकडले.

बातम्या आणखी आहेत...