आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागील काही दिवसांपासून जाफराबाद शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करुन पोलिसांची रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी व्यापारी महासंघाच्यावतीने पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आली. निवेदनात म्हटले, शहरातील मुख्य रस्त्यावरील दुकाने चोरट्यांनी मागील वर्षभरात फोडून दुकानातील माल, रोख रक्कम लंपास करून दुकानांतील सामानाची तोडफोड केली आहे. लोकवस्ती असलेल्या आदर्श नगर भागत नेहमीच चोरी होते. मात्र अद्यापपर्यंत एकाही चोरीचा तपास लागलेला नाही. आठवडी बाजाराच्या दिवशी देखील बाजारातून अनेक मोबाईल चोरीस गेले आहेत. वाढत्या चोऱ्यांचे प्रमाण पाहता पोलिसांनी गंभीर पावले उचलून चोरटयांचा तत्काळ तपास लावावा. अशी मागणी करण्यात आली. यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष हस्तीमल बंब, तालुकाध्यक्ष बाबुराव लहाने, जालना शहराध्यक्ष सतिष पंच, एकनाथ घाडगे, सुनिल भोसले, पांडूरंग लोखंडे, जगन भोपळे, अमोल पडघन, मंगेश लोखंडे, पुरुषोत्तम कुमावत, शिवाजी भिसे, मरकड, तारेख चाऊस, भोपळे, अभिषेक खंडेलवाल, सुरेश जंजाळ, संजय खंडेलवाल, राजू खुणे, प्रमोद फदाट, अभिजीत सोनुने, हरिदास जाधव, प्रदीप चव्हाण, सचिन काकडे, विजय काकडे, निवृत्ती पाबळे, निवास मोरे, द्वारकाप्रसाद राठी, किरण चव्हाण, योगेश गावंदे, परमेश्वर शिंदे, अमोल परदेशी, गणेश बावणे, गणेश फदाट, शिवाजी भिसे, प्रमोद फदाट, मंगलसिंग धवलिया, अनिल मिरगे, रविंद्र म्हस्के, अमोल जाधव, मच्छिंद्रनाथ थोरात, विनायक भोपळे आदीच्या सह्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.