आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:पोलिस तणावाखाली; लोकसंख्या 19 लाख; पोलिस फक्त दीड हजार

जालना9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कायदा-सुव्यवस्था, गुन्ह्यांची उकल, सणासुदीस कडेकोट बंदोबस्त, निवडणुका, मोर्चे, आंदोलन, ड्यूटीच्या अनिश्चित वेळांमध्ये व्यग्र असणाऱ्या पोलिसांना मानसिक ताणाला सामोरे जावे लागते. यामुळे पोलिसांना उच्च रक्तदाब, मधुमेहांसारखे विकार भेडसावतात. दरम्यान, चालू वर्षातील दहा महिन्यांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी आठ पोलिसांचा मृत्यू झाला. यात चार जण हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दोघे जण सकाळी मॉर्निंग वाॅक करीत असतांनाच मृत्यू झाल्याच्या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील १९ लाख ६८ हजार लोकसंख्या असून, वर्षाला जवळपास ५ हजार १०० घडणाऱ्या गुन्ह्यांसाठी केवळ १ हजार ५४८ मनुष्यबळ असल्याने तणावाखाली पोलिस जाण्यासाठी हे सुध्दा कारण ठरत आहे.

पोलिसांची नोकरी करीत ताणतणाव होण्यासाठी अनेक कारणे कारणीभूत आहेत. यातून अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेहांसारखे विकारही भेडसावतात. वयोमानानुसार विविध प्रकारच्या आजारांमध्ये वाढ होत असते. त्यात रात्रपाळी, बंदोबस्त, मोर्चे-आंदोलनांमध्ये औषधेच नव्हे तर जेवणाच्या वेळाही सांभाळता येत नाही. त्या ठिकाणी सकस आहार उपलब्ध होईलच, असेही होत नाही. त्याशिवाय जिल्ह्यात वर्षाला जुगार, दारूबंदीचे जवळपास २ हजार गुन्हे घडतात. चोऱ्यांचे १ हजाराच्या जवळपास गुन्हे घडत आहेत. यामुळे तपास कामाचाही पोलिसांवर चांगलाच ताण असतो. सदर बाजार सारख्या संवेदनाशील पोलिस ठाण्यात एका कर्मचाऱ्याकडे जवळपास २५ गुन्हे तपासासाठी दिलेले असतात.

जिल्ह्यास हवे आहेत आणखी दुप्पट पोलिसांचे संख्याबळ
जिल्हा पोलिस दलात सध्या १५०० पोलिस कार्यरत आहेत. परंतु ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट यांच्या शिफारशीनुसार प्रत्येक लाख लोकसंख्येला १९८ पोलिस आवश्यक आहेत. राज्यात प्रमाण केवळ १७४ आहे तर जालना जिल्ह्यात ८० पेक्षा कमी आहे. त्यामुळे (संदर्भ : २४ मार्च २०२१ रोजी गृह मंत्रालयाने राज्यसभेत दिलेली माहिती)

पोलिसांवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न
पोलिसांवरील ताण कमी करण्याच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने विविध बदल केले जात आहेत. आरोग्य तपासणी, रक्त तपासणी यासह विविध कार्यशाळाही घेतल्या जात आहेत. प्रशासकीय स्तरावर सानुग्रह अनुदानातून मृताच्या कुटुंबीयांना दिल्या जाते. पोलिसांचे मनुष्यबळ वाढवण्याच्या अनुषंगानेही पाठपुरावा सुरू आहे. डॉ. अक्षय शिंदे, पोलिस अधीक्षक, जालना.

जालना जिल्ह्यात अशी आहे पोलिसांची संख्या
जालना जिल्ह्यात १ हजार ५४८ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या आहे. यात जिल्ह्यात १८ पोलिस ठाण्यांसह १९ पोलिस चौक्या आहेत. चौक्यांवर ११५ जण कार्यरत आहेत. सर्वाधिक मुख्यालय असलेल्या जालना शहरातील सहा ठाण्यांसह विविध विभागांमध्ये ११११ जण कार्यरत आहेत.

बातम्या आणखी आहेत...