आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुंभार पिंपळगाव घनसावंगी तालुक्याचे राजकारण ऊसाभोवती येऊन थांबल्यामुळे या लोकांचे २५ वर्ष निभावले आहेत. इतकेच काय विकास केला काय आणि नाही केला काय हे विचारण्याची कोणाची हिम्मत यांना नव्हती हे तालुक्याचे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. प्रस्तापितांच्या जाचातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी मी समृद्धी साखर कारखाना आणि भाजप पक्ष यांच्या माध्यमातून मैदानात उतरलो आहे. या माध्यमातून घनसावंगी तालुक्यात राजकारण अन कारखानदारी वेगळी झालीच पाहिजे असे प्रतिपादन भाजप नेते सतिष घाटगे यांनी केले.
घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी येथे ५ फेब्रुवारी रोजी पक्ष प्रवेश व शाखा उदघाट्न सोहळा समृद्धी उद्योग समूहाचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश घाटगे यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी बोलताना म्हणाले की, यापुढे जिथे जिथे शेतकऱ्यांला अडवले जाईल, तिथे तिथे मी समृद्धी उद्योग समूहाच्या तथा भाजप पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर पणे उभा राहील. आज जी प्रस्थापितांनी उसाच्या राजकारणातून भीती दहशद शेतकऱ्यांच्या मनात भरवली आहे. तिच भीती मी प्रस्थापितांच्या मनात येणाऱ्या काळात करेल.
आगामी काळात सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप पक्ष वाढीवकरिता आटोकत प्रयत्न करण्याचे आव्हान समृद्धी उद्योग समूहाचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश घाटगे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमात सतीश घाटगे यांच्या हस्ते भाजप पक्षात जोगलादेवी येथील विठ्ठल बाबासाहेब खोजे, विठ्ठल साहेबराव खोजे, सुभाषराव खोजे, अशोकराव खोजे, संतोष नितळ, विनोद खोजे, एकनाथ गायकवाड, संभाजी खोजे, दत्ता पाटोळे, संतोष बळते, ज्ञानेश्वर खोजे, बालाजी फडताळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात प्रवेश केला केला.
यावेळी मंचावर शिवाजीराव बोबडे तालुका अध्यक्ष किसान मोर्चा अरुण घुगे, अंकुशराव बोबडे, पुरूषोत्तम उढान, गणेश पघळ, विलास होंडे, रामेश्वर, अंबादास गोरे, शरद खरपडे, प्रल्हाद भालेकर, रामेश्वर गरड, रोहन भालेकर, भरत उढान, अशोक डोंगरे, राजेंद्र गायकवाड, गजानन चव्हाण, बालाजी खोजे, दिलीप खोजे, नंदकुमार जंगले, अंगत ऐसलोटे, निखिल फलके, वसंत दादा खोजे, चत्रभुज काळे, काळे आदीनी नियोजन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.