आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध विकासकामाचे उद्घाटन:विकासात राजकारण कधीच आडवे आणले नाही : दानवे

पिंपळगाव रेणुकाई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनतेने विश्वास ठेवून मला सलग दुसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली आहे. त्याचेच फलीत म्हणून जनतेचा सेवक म्हणून आपण मतदारसंघात आतापर्यंत कुठेही दुजाभाव न करता भरघोस अशी विविध विकासकामे करून मतदारसंघाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन आमदार संतोष दानवे यांनी एका कार्यक्रमात केले. भोकरदन तालुक्यातील अवघडराव सांवगी येथे दोन कोटी रुपयाचे विविध विकासकामाचे उद्घाटन आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते झाले. त्या निमित्ताने ते बोलत होते.

यावेळी या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून भोकरदनचे उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव, माजी उपसभापती सुखलाल बोडके,सरपंच सत्तार बागवान, मधुकर ठाकरे, प्रकाश पाटील, गजानन गांवडे, बाळाराम शिंदे, ताराचंद आहेर, बाबुराव बेराड, शिवा आहेर, शैलेश बोर्डै आदीची उपस्थिती होती. पुढे बोलताना संतोष दानवे म्हणाले की, आता राज्यात शेतकऱ्यांच्या विचाराचे सरकार स्थापित झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे काहीही एक कारण नाही. शेतकरी समृद्ध आणि विकसित व्हावा यासाठी शिंदे-भाजपा युतीचे सरकार प्रयत्न करणार असल्याचे देखील दानवे यांनी सांगितले. तत्कालीन ठाकरे सरकारने यापुर्वी शेतकऱ्यांच्या हिताच्या संपूर्ण योजना बंद केल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांचा विकास थांबला होता. पंरतु आता या बंद केलेल्या योजना पुन्हा कार्यान्वित करण्याचा राज्य सरकारचा भर असणार आहे. तसेच या सरकारचा फायदा नक्कीच आपल्या मतदारसंघाला होणार असल्याने आपण देखील कोट्यावधी रुपयाची विकास कामे खेचुन आणणार आहोत.

विकास कामांची गंगा
गावासाठी जलजिवन मिशन अंतर्गत एक कोटी ८५ लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याने या गावाचा पाण्याचा प्रश्न आता कायमचा मिटणार आहे.तसेच आमदार स्थानिक निधीतुन शादीखाना बांधकामासाठी १५ लक्ष रुपयाचा निधी देखील देण्यात आल्याने मुस्लिम बांधवानी आमदार संतोष दानवे यांचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...