आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Jalna
  • Poor Condition Of Ashti To Likhit Pimpri An Brahmanwadi Road; Exercise For Transportation, Condition Of 6 Km Road From Ashti To Brahmanwadi, Demand For Road Repair | Marathi News

दुरवस्था:आष्टी ते लिखित पिंपरी अन् ब्राह्मणवाडी रस्त्याची दुरवस्था; वाहतुकीसाठी कसरत, आष्टी ते ब्राह्मणवाडी सहा किमी रस्त्याचे हाल, रस्ता दुरुस्तीची मागणी

आष्टी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी ते लिखित पिंपरी व लिखित पिंपरी ते ब्राह्मणवाडी या तीन गावांसाठी असलेल्या सहा किमी अंतराच्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

रस्ता म्हणजे विकासाचा मार्ग. रस्ते झाले तरच विकासालाही गती येते. असे असताना आष्टी ते लिखित पिंपरी, लिखित पिंपरी ते ब्राह्मणवाडी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतूक करणे कठीण झाले आहे. विशेष म्हणजे आष्टी-लिखित पिंपरी मार्गे सेलू या अत्यंत महत्त्वाचा समजला जाणाऱ्या रस्त्यावर आष्टी फाटा ते लिखित पिंपरीदरम्यान रस्त्याची अवस्था बिकट आहे. सेलू तालुका हद्दीतील रस्ता नुकताच डांबरीकरण झालेला आहे. परंतु लिखित पिंपरी ते आष्टी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अनेक वर्षांपासून झाले नाही. मागील वर्षी या रस्त्यावर थातूरमातूर डागडुजी करण्यात आली. यामुळे रस्त्याचा प्रश्न “जैसे थे’ आहे.

सध्याच्या परिस्थितीत रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्याची अगदी चाळण झाली आहे. सेलू ते शिंदे टाकळीदरम्यान रस्त्याचे काम झाल्यामुळे या मार्गावर वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दुसरीकडे लिखित पिंपरी ते ब्राह्मणवाडी हा सहा किलोमीटर अंतर असलेला जोडरस्ता अद्याप खडीकरण व डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.

या रस्त्याची अवस्था दुर्गम, आदिवासी भागातील रस्त्यापेक्षाही वाईट आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता आहे हेच समजत नाही. या मार्गावर दुचाकी वाहनच काय, परंतु साधे पायी चालणे जिकिरीचे झाले आहे.

विशेष बाब म्हणजे या मार्गावर शेतीमाल आणण्यासाठी शेतकरी वैतागून गेला आहे. पावसाळ्यात तर रस्त्याच्या चिखलात बैलगाड्या फसतात. संबंधित रस्त्याच्या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. दरम्यान, दळणवळणाच्या सुविधेच्या दृष्टीने मुख्य रस्त्याबरोबरच आता पाणंद रस्त्यावरही भर दिला जात आहे. असे असताना लिखित पिंपरी-ब्राह्मणवाडी रस्त्याचे भाग्य कधी उजळणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

बातम्या आणखी आहेत...