आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ता:तळणीत तरुणाच्या हाती सत्ता

तळणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मंठा तालुक्यातील सर्वात मोठी असलेली तळणी ग्रामंपचायतचा धक्कादायक निकाल लागला असून सरपंचपदी भीमशक्तीचे तरुण गौतम सदावर्ते हे निवडूनआले आहेत. तळणीच्या इतिहासात प्रथमच तरुण उमेदवाराला सरपंच पदी विराजमान होण्याची संधी मिळाली.

मागील पाच वर्षाचा कालखंड बघता गावातील विज रस्ते पाणी व सामाजीक समस्याचे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. भाजपा वगळता इतर पक्षानी पक्षाचा नावाचा वापर न करता निवडणूक लढवली. सरपंचपदाचे आरक्षण हे अनुसूचित जाती साठी सुटले असल्या कारणाने सहा उमेदवार सरपंच पदाच्या निवडणूकीसाठी उभे होते. यात गौतम सदावर्ते यांनी एकतर्फी विजय मिळवला. विजयी झालेल्या उमेदवारांनी गावातून मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला.

बातम्या आणखी आहेत...