आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारांजणी या ठिकाणी वीजभार वाढल्याने येथील ग्रामस्थांना दररोज पहाटेच्या वेळी चार तासांच्या भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. घनसावंगी तालुक्याच्या उत्तरेकडील सीमेवर असलेले २३०० ते २५०० उंबरे असलेले जवळपास बारा ते पंधरा हजार लोकसंख्येचे मोठे गाव आहे. त्यामुळे या गावात घरगुती वीजेची मोठया प्रमाणात गरज भासते. या गावात एकूण बारा रोहित्रें बसविण्यात आली आहेत.
मात्र अधिकृत वीज जोडणी ग्राहकांची संख्या सातशे ते आठशे पर्यंत आहे. बारा रोहित्र आणि आठशे वीज ग्राहक असताना रोहित्र जळण्याचे सत्र सुरूच आहे. मात्र अनाधिकृत वीज वापर मोठ्या प्रमाणात असल्याने वीज भार वाढत असल्याने असे प्रकार होत आहेत. विशेष म्हणजे या विद्युत तारा चाळीस वर्षांपासून च्या जुन्या असल्याने जीर्ण झाल्या असून लोंबकळत आहेत. अनाधिकृत वीज घेताना तारांची ओढाताण होते. या ओढाताणीत तारांचे घर्षण होवून तारा एकमेका वर आदळल्याने चिटकतात व त्यामुळे सतत फॉल्ट होवुन वीज प्रवाह खंडीत होतो. किंवा रोहित्र जळण्याचे प्रकार घडतात. दैनंदिन वीज भार वाढत असल्याने एका ठिकाणचे रोहित्र जळाले त्याच्या जवळील दुसऱ्या रोहित्रा वरुण अनाधिकृतपणे सर्रास वीज जोडणी केली जाते. यामुळे भार वाढला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.