आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई उपकेंद्रांतर्गत महावितरणच्या वतीने कृषी पंपाचा वीजपुरवठा थकीत बिल भरण्यासाठी खंडित करण्यात आला होता. याबाबत शिवसेनेने रस्त्यावर उतरत पारध येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनात ४०० ते ५०० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. चार तास चाललेल्या आंदोलनाची दखल घेत मुभा देत महावितरणकडून विजपुरवठा सुरळीत करण्यात आला.महावितरणच्या वतीने कृषी पंपाच्या वीजपुरवठा खंडित केल्याने रब्बीतील गहू, ज्वारीसह मका व इतर पिके धोक्यात आली होती. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन शिवसेनेच्या वतीने पारध येथील बस स्थानकावर गुरुवारी रस्ता रोको करण्यात आला. या रस्ता रोकोमुळे काही काळ मराठवाडा व विदर्भ मार्गावरील वाहतूक टप्प झाली.
यावेळी वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता गावंडे यांना निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना तीन हजार रुपये प्रति कनेक्शन प्रमाणे चालू विज बिल भरावे असे आवाहन यावेळी वीज वितरण कंपनीने केले आहे. जवळपास ४ तास हे आंदोलन पारध बस स्थानकावर सुरु झाले होते. यावेळी शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांच्या नाकर्तेपणावर घोषणा दिल्या. यावेळी रस्ता रोकोमुळे काही काळ मराठवाडा व विदर्भाकडे जाणारी वाहतूक टप्प झाली होती. दरम्यान, रस्ता रोको सुरू होताच खंडित पुरवठा पूर्ववत केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरल्याचे पहायला यावेळी मिळाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.