आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रबोधन उत्सवाचे आयोजन:प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधन उत्सव

जालना22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संयुक्त महाराष्ट्र लढाईतील अग्रगण्य पत्रकार, लेखक, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने प्रबोधन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी शनिवारी सकाळी ११ वा. भाग्यनगर स्थित मराठा सेवा संघ कार्यालयात संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री ॲड. मनोज आखरे आणि वरिष्ठांच्या सूचनेनुसार आयोजित या विचार व कृतींच्या जागर सोहळ्यास संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष संतोष गाजरे ,प्रदेश संघटक प्रा सुदर्शन तारख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

तरी जालना शहर जिल्हा व सर्व तालुक्यातील संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रमुख,कामगार, शिक्षक, महिला, विद्यार्थी व परिवर्तनवादी चळवळीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विजय वाढेकर, कैलास खांडेभराड, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा दिपाली दाभाडे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...