आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाळेत विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा आणि नाविन्यपूर्ण अनुभव व प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार ज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी हा बाल आनंद मेळावा उपयोगी ठरत असल्याचे मत मुख्याध्यापक बाबासाहेब ताठे यांनी व्यक्त केले. मंठा शहरातील द्रोपदाबाई आकात शाळेत आयोजित आनंदनगरी बाल मेळाव्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ४० विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थाचे स्टॉल लावले होते. यावेळी उपमुख्याध्यापक राजकुमार ठोकरे, रमेश ढवळे, एस. एन. मोरे, ज्ञानेश्वर वायाळ, महादेव नेवरे, दिगंबर निर्वळ, मुख्याध्यापिका एफ. ए .शेख यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
ताठे म्हणाले, विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर व्यावहारिक ज्ञान प्राप्त होण्यासाठी आनंद मेळावा फायद्याचा ठरतो. याप्रसंगी सुनीता पवार यांनी सांगितले, आनंदनगरी सारख्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना आनंद मिळतो. त्याशिवाय त्यांना व्यवसायासाठी लागणारे कौशल्य व ज्ञान प्राप्त होते. आपण व्यवसायात पैसे कमवू शकतो याची प्रेरणा त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. विद्यार्थ्यांनी पावभाजी, इडलीवडा, मटकी, गुलाबजामून, चिवडा, भेल, वडापाव, मुगवडा, खिचडी, कचोरी, समोसा, पाणीपुरी, चणे, चहा, मिनरल वॉटर यह अनेक खाद्यपदार्थाचे स्टाॅल लावले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.