आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंता:खरीप हंगाम पूर्व मशागतीची कामे जवळपास पूर्ण;' मान्सून सक्रिय न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

चिखली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर तालुक्यातील चिखली परिसरात खरीप हंगाम पूर्व मशागतीची कामे जवळपास पूर्ण झाले आहे आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा केवळ दमदार पावसाची आहे.जूनचे पंधरा दिवस होऊन गेले तरीही मान्सून अद्यापपर्यंत सक्रीय न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील वर्षी कपाशीला चांगला बाजार भाव मिळाल्यामुळे यावर्षी कपाशी तूर सोयाबीन ही पारंपारिक पीके घेण्यासोबत काही शेतकऱ्याने जुन्या पिकांना फाटा देत व्यवसायात बदल करून काही नवीन पिके घेण्यास सुरवात केली आहे.

या हंगामात पाऊस कधी येईल व कधी पेरणी करावी याचा अंदाज नसल्याने शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी पैशाची जमवाजमव सुरू केली आहे. यावर्षी नवनवीन कंपनीचे बियाणे विक्रीसाठी आले आहेत. कापूस, सोयाबीनकडे गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा कल आहे. यावर्षी उत्पादन व भाव चांगला मिळाला असल्यामुळे यावर्षी कपाशी सोयाबीन याचा पिकाचा पेरा वाढणार आहे. या हंगामात शेतकरी खरिपाच्या पेरणीसाठी सोयाबीन कापूस तूर मूग आदी पिकांचे बियाणे खरेदी करण्यासाठी उसनवारी करून कृषी सेवा केंद्रामध्ये बियाणे खरेदीसाठी येत आहेत.

शेती उत्पादनासाठी शेतकरी नामांकीत कंपन्यांच्या रासायनिक खतांना पसंती देत असल्याचे त्याची जास्त मागणी आहे. यावर्षी चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने सांगितल्यानुसार शेतकरी मोठ्या उत्साहाने पावसाची प्रतीक्षा करीत आहेत, मृग नक्षत्रामध्ये पेरणी व लागवड झाल्यास उगम शक्ती चांगली असते व उत्पादनही वाढते असे जाणकार शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, तालुकास्तरीय भरारी पथक नेमण्यात आली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे बोगस बियाणे घेऊ नये त्याच बरोबर पक्क्या पावत्या शेतकऱ्यांनी घ्याव्या असे आवाहन तालुका कृषी अधिकारी व्यंकट ठक्के यांनी सांगितले. कुठे जर बोगस बियाणे आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क करावा व तालुका कृषी अधिकारी संपर्क करावा, आणि ज्या व्यक्तीने ही माहिती दिली त्या व्यक्तीचं शेतकऱ्यांचे नाव गुपित ठेवण्यात येईल, असे ठक्के म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...