आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेरणी:खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना टेंभुर्णी परिसरात आला वेग, शेतकऱ्यांची लगबग

टेंभूर्णी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेत शिवार : वीस दिवसांवर येऊन ठेपलेल्या खरीप हंगामासाठी शेतकरी लागले तयारीला, उन्हामुळे रात्री काम

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी आणि परिसरात खरिपाच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे.जाफराबाद तालुक्यात गतवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने रब्बी हंगामामध्ये परिसरात पाण्याची मुबलकता होती. परिणामी बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कपाशी पिकासह रब्बी हंगामात दोन दोन पिके घेतली कापूस एकानेही यावर्षी शेतकऱ्यांना चांगला हातभार लावल्याने अजूनही बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात कपाशीचे पीक उभी आहे.

वीस दिवसांवर येऊन ठेपलेल्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची गहू, हरभरा, कपाशीचे शेते मशागत करून तयार करण्यासाठी लगबग दिसत आहे. उशिरा पेरणी झालेल्या रब्बीतील गव्हाची काढणी उशिरा झाली परिणामी अजूनही शेतामध्ये गव्हाचे ठिकठिकाणी उभे आहे. शेतकऱ्यांकडून रात्रीच्या वेळी शेतातील काडीकचरा पाला पाला पाचोळा व गव्हाची कार्ड पेटवून दिले जात आहे. याशिवाय नांगरणीच्या कामांनी वेग घेतला आहे. ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करण्याकडे बहुतांश शेतकऱ्यांचा कल असून पारंपरिक पद्धतीने बैलांच्या साह्याने कुठेही नांगरणी करताना शेतकरी दिसत नाही.

बहुतांश ठिकाणी कपाशीचे पीक अजून उभेच आहे तर काही शेतकऱ्यांकडून कपाशीच्या पऱ्हाट उपटण्याचे काम सुरू आहे. खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीच्या कामांनी वेग घेतला असून अंगाची लाहीलाही करणारे ऊन पाहता शेतकऱ्यांकडून मशागतीची कामे सकाळी व सायंकाळी केली जात आहेत. दरम्यान रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांची कुटुंबे शेतात कामे करताना दिसत आहे. खरीप हंगामात कपाशी व सोयाबीन पिकाची लागवड करण्याकडे जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्यांचा कल दिसत आहे तर अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी मिरचीची लागवडही केली आहे. येथील मिरची विक्रीसाठी इतर राज्यातही जात आहे. .

उन्हामुळे दिवसा आराम रात्री शेतात काम सद्यस्थितीत उन्हाचा पारा प्रचंड वाढलेला असून सकाळी नऊ वाजेपासून अच अंगाची लाहीलाही करणारे ऊन आहे यामुळे शेतकऱ्यांना कडक उन्हामध्ये शेतीची कामे करणे टाळावे लागते. परिणामी दिवसा आराम रात्री काम अशी शेतकऱ्यांची दिनचर्या बनली आहे. परंतु शेतीची खरी पूर्वमशागत केल्याशिवाय पर्याय नसल्याने रात्री-अपरात्री नांगरणी व रोटावेटर साठी शेतात जावे लागत असल्याचे ज्ञानेश्वर उखर्डे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...