आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊस उचल:कार्यक्षेत्रातील शेतकऱ्याचा ऊस आधी उचलण्यास प्राधान्य देणार

भोकरदन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील रामेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सर्व ऊस उचलण्यास आधी प्राधान्य देण्यात येईल, नंतर बाहेरचा ऊस घेऊ, अशी ग्वाही आमदार संतोष दानवे यांनी दिली. त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्यासाठी डिस्टलरीसह इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प उभारण्याचे कारखान्याचे धोरण असल्याचे सांगितले.

श्री रामेश्वर सहकारी साखर कारखान्याची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन विजय परिहार होते. व्यासपीठावर व्हाईस चेअरमन दादाराव राऊत, कार्यकारी संचालक इ.आर. कोलते, गणेश फुके, मदन कुलवाल, शिवराम कड, शोभा मतकर पंढरीनाथ खरात, सुरेश दिवटे, आत्माराम सुरडकर आदींची उपस्थिती होती. आमदार दानवे म्हणाले, साखर कारखान्याशी सलग्न असे विविध प्रकल्प कारखान्यात असल्यास साखर कारखान्याचा आर्थिक विकास साध्य होण्यास मदत होते.

आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे शेतकऱ्याच्या ऊसाला जास्तीचा दर देता येतो या अनुषंगाने आपल्या कारखान्याने साखर कारखान्याशी संलग्न असा डिस्टीलरी प्रकल्पाची उभारणी करण्याचे धोरण ठरविले आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त साखर उतारा देणारा ऊसाचीच लागवड करावी, कारखान्याचे इतर प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्यापासून मिळणाऱ्या शिल्लक आर्थिक उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांच्या उसाला हमीभावापेक्षाही जास्त भाव देता येईल असे सांगितले. ज्ञानेश्वर ठोंबरे, ए. बी. मानापुरे, कृष्णा गिरणारे, एस. बी. चावरे, आर. सी. चौधरी, शरद घायवट, जी. एम. मोरे, एस. पी. वाघ, ज्ञानेश्वर कडवणे, सरपंच नवाबराव घायवळ, विजय दाभाडे, दादाराव गावंडे, रवी शेळके, बाळू पुजारी, समाधान चव्हाण यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

लवकरच निधी उपलब्ध करुन निविदा काढू इंधन आयातीवरील खर्चाचा बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने इंधनामध्ये १० टक्के पर्यंत इथेनॉलचा वापर करण्याची अनुमती दिली आहे. देशामध्ये इथेनॉलचे उत्पादन वाढावे, प्रदूषण कमी व्हावे, म्हणून शासनाने योजना तयार केली आहे. सर्व बाबींचा विचार करून कारखान्यात तीस के एल पी डी क्षमतेचा डिस्टिलरी प्रकल्प उभारून त्यातून इथेनॉल रेक्टिफाइड स्पिरिट व एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोलचे उत्पादन करण्याचे ठरविले आहे. डिस्टिलरी प्रकल्पासाठी इसी रेशन वायलरचा उपयोग करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक केंद्र व राज्य सरकारच्या परवानग्या मिळाल्या आहेत. आता केवळ निधी उपलब्ध करून घेऊन निविदा काढण्याचे काम बाकी आहे. तेही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असेही आमदार संतोष दानवे यांनी सांगितले. या कार्यक्रमाला परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...