आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:वडीगोद्री आरोग्य केंद्रात गरोदर महिला; मानव विकास कार्यक्रमांतर्गत राबवला उपक्रम

वडीगोद्री11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मानव विकास कार्यक्रमांतर्गत ५० गरोदर महिला व बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शिबिरात गरोदर माता, स्तनदा माता व ६ वर्षांआतील बालकांना मार्गदर्शन करण्यात आले. हिमोग्लोबिन व वजन तपासणी करण्यात आली. तसेच एक महिन्याची औषधी देण्यात आले. दोन डोस लसीकरण व दोन सोनोग्राफी झाल्या आहेत की नाही याचीसुद्धा तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गरोदर माता यांना जेवण देण्यात आले.

सर्वांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकातून उपकेंद्रे येथून आणून परत घरी सोडण्यात आले. बालरोगतज्ज्ञ डॉ. रणजित जाधव, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सोनल खारडे यांनी गरोदर महिला व बालकाची आरोग्य तपासणी केली. या विशेष कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कांगणे, डॉ. अक्षय वाघ, डॉ. विठ्ठल जाधव, औषध निर्माण अधिकारी भानुदास काळे, एच. बी. राठोड, एस. जी. निकम, व्ही. एन. गायकवाड, बळी योगेश, आय. एच. पठाण, डॉ. स्वप्निल सानप, डॉ. सुयोग्य उगले, डॉ. प्राजक्ता मोरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...