आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:गरोदर महिला, बालकांना पोषण आहार; वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपक्रम

वडीगोद्री17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मानव विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात गरोदर ५० महिला व बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यावेळी या शिबिरात गरोदर माता, स्तनदा माता व ६ वर्षा आतील बालकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये हिमोग्लोबिन व वजन तपासणी करण्यात येते. तसेच त्यांना १ महिन्याची औषधी देण्यात येते. दोन डोस लसीकरण व दोन सोनोग्राफी झाल्या आहेत की नाही याची सुद्धा तपासणी करून मार्गदर्शन केले जाते. यावेळी गरोदर माता यांना जेवण दिले जाते. या सर्वांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकातुन उपकेंद्रे येथून आणले जाते. तसेच त्यांना परत घरी सोडले जाते.यावेळी बालरोग तज्ञ डॉ.रणजित जाधव व स्त्री रोग तज्ञ डॉ.सोनल खारडे यांनी गरोदर महिला व बालकाची आरोग्य तपासणी केली. तसेच यावेळी भानुदास काळे यांनी औषधी वाटप केली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कांगणे, डॉ. अक्षय वाघ व डॉ. विठ्ठल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी औषध निर्माण अधिकारी भानुदास काळे, आरोग्य सहाय्यक एच.बी.राठोड, एस. जी. निकम, व्ही. एन. गायकवाड, आरोग्यसेवक बळी योगेश, आरोग्य सेविका आय. एच. पठाण, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील सानप,डॉ. सुयोग्य उगले, डॉ. प्राजक्ता मोरे आदींनी यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...