आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बक्षीस वितरण:मखर सजावट स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरातील करण जाधव यांनी जुन्या जालन्यातील महिला, मुलींसाठी मखर सजावट स्पर्धा आयोजित केली होती. यातील विजेत्यांना बक्षिसाचे वितरण व दीपावली पाडवा स्नेहमिलनाच्या अनुषंगाने ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता संजयनगर येथील मारुती मंदिराच्या सभागृहात कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कैलास गोरंट्याल उपस्थिती राहणार आहेत.

अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल राहतील. या वेळी उपविभागीय अधिकारी संदिपान सानप, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, पोलिस निरीक्षक एम. ए. सय्यद, राजेश कामड, मोहन इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...