आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बक्षीस:क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस

भोकरदनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जनविकास शिक्षण संस्था संचलित श्री गणपती इंग्लिश/ मराठी हायस्कूलच्या आंतरशालेय वार्षिक क्रीडा स्पर्धाचा समारोप पोलिस निरीक्षक रत्नजीत जोगदंड, केंद्र प्रमुख आर. एच. सोनवणे, संचालक इंद्रजीत देशमुख यांच्या उपस्थितीत झाला.

प्रारंभी विद्यार्थ्यांनी आपल्या टीमचे ध्वज हाती घेऊन पथसंचलन केले. त्यानंतर विविध खेळाचे प्रात्यक्षिके, मनोरे, लेझिम, डमरू यांच्या कवायती सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विजयी स्पर्धकांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी गोपनीय शाखेचे बावसकर, पी. बी. रोजेकर, प्राचार्य आर. आर. त्रिभुवन, मनोज लेकुरवाळे, लता गायके, प्रशासकीय अधिकारी सोपान सपकाळ, पर्यवेक्षक जि. व्ही. जाधव, गजानन बुलगे, क्रीडा शिक्षक अशोक नवगिरे, गौतम खाडे यांच्यासह शिक्षक, पालक आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता शिला पगारे यांच्या ग्रुपने सादर केलेल्या वंदे मातरम गीताने करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...