आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरित:राष्ट्रमाता महाविद्यालयात विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या ३१ वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरित करण्यात आले.प्रारंभी प्राचार्या डॉ. सुनंदा तिडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जगत घुगे, प्रा. डॉ. आनंद कुलकर्णी, छाया कव्हळे, प्रा. डॉ. प्रताप रामपुरे, अर्जुन भाबड, शिंगेणे, बाबासाहेब डोंगरे, प्रा. सचिन जायस्वाल, प्रा. सोमीनाथ खाडे यांची उपस्थिती होती. छाया कव्हळे म्हणाल्या की, या महाविद्यालयाने मला खूप प्रेरणा दिली, म्हणून मी यश संपादन करू शकले. आजच्या विद्यार्थ्यांने मनामध्ये एक चांगले स्थान घेऊन प्रगती केली, तर निश्चित यश मिळते.

आपल्याला चांगले जगायचे असेल तर चांगले पोषण आहार घ्यावा, असे आवाहन केले. प्रा.डॉ. आनंद कुलकणों यांनी योग्य दिशेने मनात विचार ठेवून कार्य करावे. आपल्या महाविद्यालयात गोरगरीब आदिवासी इत्यादी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते, ही अभिमानास्पद बाब आहे.

विद्यार्थ्यांनी मीच माझ्या आयुष्याचा शिल्पकार आहे, हा संदेश मनात ठेवून वाटचाल करावी. तसेच मानसाने आपल्या जीवनात प्रामाणिकपणा ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्रा. डॉ. ज्योती धर्माधिकारी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी, तर प्रा. डॉ. विक्रम दहिफळे यांनी आभार मानले. प्रारंभी संत भगवानबाबा, इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर रमीजा रमजानी हिने स्वागत गीत गायले. याप्रसंगी मंथन भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. त्यानंतर वर्धापनदिनानिमित्त सांस्कृतिक व क्रीडा विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...