आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप‎:अतिक्रमण काढण्याची कार्यवाही‎ राजकीय दबावापोटी, एकतर्फी‎

भोकरदन‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जालना रस्त्यावरील‎ अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही‎ करण्यात आली असुन ही‎ कार्यवाही एकतर्फी आणि राजकीय‎ दबावापोटी झाल्याचा आरोप आम‎ आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष‎ कडुबा बोरसे यांनी केला आहे.‎ प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात‎ म्हटले आहे की, रस्ता रुंदीकरणही‎ अतिशय आवश्यक बाब आहे.‎ परंतु रस्ता रुंद करण्यासाठी मार्किंग‎ करतांना रस्त्याच्या सेंटर पासुन‎ दोन्ही बाजुला सारखे अंतर घेवुन‎ मार्किंग करण्यात यावी असा नियम‎ आहे. असे असताना काही खास‎ लोकांच्या मालमत्ता‎ वाचवण्यासाठी एका बाजुला कमी‎ अंतर तर सरकारी‎ कार्यालयाकडच्या बाजुने जास्त‎ अंतर घेवुन मुद्दाम चुकीची मार्किंग‎ करण्यात आली आहे. वास्तविक‎ सरकारी कार्यालयांनी अतिक्रमण‎ केले नाही.

सरकारी कार्यालयाच्या‎ बांधकामावर करण्यात आलेला‎ खर्च वाया गेला असुन पुन्हा‎ बांधकाम करण्यासाठी जनतेच्या‎ पैशातुन खर्च करावा लागणार‎ आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय,‎ पंचायत समीती कार्यालय, जि.प.‎ शाळा, पोलीस काॅर्टर, सार्वजनीक‎ बांधकाम विभागाचे कार्यालय व‎ गेस्ट हाऊस या सर्वच‎ कार्यालयाच्या बांधकामांना‎ अतिक्रमण गृहीत धरुन काढण्यात‎ आले आहे. यास चुकीची मार्किंग‎ करणारे अधिकारी व चुक‎ असतांना आक्षेप न घेणारे व‎ अतिक्रमण करणारे अधिकारी‎ जबाबदार आहेत. हा खर्च आरोग्य‎ अधिकारी, गटविकास अधिकारी,‎ जि.प. शाळेचे मुख्याध्यापक,‎ पोलीस क्वार्टर विभाग प्रमुख ,‎ सार्वजनीक बांधकाम उप अभियंता‎ यांच्या पगारातुन वसुल करुन‎ त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल‎ करावेत, अशी मागणी करण्यात‎ आली आहे. पत्रकावर महजाद‎ खान, जनार्धन सोळंके, हाजीभाई,‎ संतोष बोरसे, सुरेश लोखंडे,‎ रामेश्वर काळे यांच्यासह आदींच्या‎ सह्या आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...