आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोभायात्रा:भागवत कथेनिमित्त मंठ्यात शोभायात्रा

मंठा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवत्स राधाकृष्णजी महाराज यांच्या श्रीमद भागवत कथेला १३ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी शनिवारी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्री गणेश लॉन्स मंगल कार्यालय येथून निघालेल्या शोभायात्रेत शहरातील विविध शाळेचे लेझीम, विविध सजीव देखावे, पारंपरिक बंजारा वेशभूषेतील पथकासह मंगल कलश घेऊन महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राम कृष्ण हरीच्या गजरामध्ये प्रभात फेरी मंडळासह शहरातील व्यापारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रथामध्ये स्वार राधाकृष्णजी महाराज यांच्यावर ठिकठिकाणी फुलांचा वर्षाव करण्यात आला. ही शोभायात्रा मेन रोडने गोवर्धन धाम कथास्थळी पोहोचली. रस्त्याने नागरिकांनी भावीक भक्तांसाठी दूध व पाण्याची व्यवस्था केली होती.

रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. श्रीमद भागवत कथास्थळी येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंग व्यवस्थेबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे व उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे, पोलिस निरीक्षक संजय देशमुख, पोलिस उपनिरीक्षक बलभीम राऊत यांनी पाहणी करत पार्किंग व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी कथेचे यजमान दत्तप्रसाद झंवर, रामकृष्णहरी प्रभात फेरी मंडळाचे जुगल किशोर कासट, श्रीराम लखोटिया, आनंदराम सोमानी, गोविंदप्रसाद भांगडिया, राजेभाऊ झोल, बाबासाहेब दवणे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...