आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील आदर्श नगर येथील भारतीय सैन्य दलातील सैनिक दिनेश बाबुराव दांडगे हे २ फेब्रुवारी रोजी १७ वर्ष सैन्य दलातील नोकरीनंतर सेवानिवृत्त झाले. जाफराबाद शहरात त्यांचे आगमन होताच माजी सैनिक संघटना आणि परिसरातील नागरिकांच्या वतीने त्यांचे ढोल ताशा आणि फटाक्याच्या आतिषबाजीत मिरवणूक काढत स्वागत करण्यात केले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन फुलांनी सजविलेल्या वाहनातून छत्रपती शिवाजी महाराज चौकापासुन काढण्यात आलेली मिरवणूक तहसिल रोड, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर, मुख्य मार्केटपर्यंत काढण्यात आली.
शहरातील महापुरुषांच्या चौकांमध्ये भारत माता की जय चा नागरीकांनी जयघोष केला तसेच ठिकठिकाणी माता भगिनींनी औक्षण केले. तसेच सामाजिक, व्यापारी, राजकीय व्यक्ती आणि नागरिकांनी पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन सैनिक दांडगे यांचे स्वागत केले. यावेळी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुंडलीक मुठ्ठे, जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर भोपळे, माजी सैनिक गफ्फार पठाण, उपप्राचार्य डाॅ. सुनिल मेढे, नगरसेवक अनिल बोर्डे, बाबुराव दांडगे, प्रा.निवृत्ती बनसोडे, लिंबाजी हिवाळे, पैठणे, मिलिंद सोनवणे, राहुल गवई, चंद्रकला दांडगे, रुपाली दांडगे, सिद्धार्थ दांडगे, संबोधी दांडगे, टिया दांडगे, आर्यन दांडगे, सिद्धार्थ पगारे, संध्या पगारे, निलेश हिवाळे, कुणाल दांडगे, उमेश सुरडकर, विजय साळवे, श्रीकांत पारवे, श्रीकांत आढावे, शशिकांत इंगळे, काशीनाथ पंडीत, प्रा. सिध्दार्थ पैठणे, प्रा.अनिल वैद्य, राजेश वाघ, मिलिंद सोनवणे, चंद्रकांत दांडगे, रवी हिवाळे, राहुल गवई, सौरभ गोफणे, स्वप्नील पारवे, आकाश हिवाळे, सानिध्य पगारे, सचिन पंडीत, संदिप पारवे, सुरेश जाधव यांच्यासह आदींची उपस्थिती होती. स्वागताने भारावून गेलो सैन्यात नोकरी करुन घरी परतल्यानंतर सर्वानी केलेल्या भव्य स्वागताने मी भारावुन गेलो आहे. मी सैन्यात ज्या पध्दतीने देशसेवा केली त्याच पध्दतीने सामाजिक कार्यातुन कार्य करणार आहे. युवकांनी देश सेवेत जाण्यासाठी प्रेरीत करणार असल्याचे सेवानिवृत्त सैनिक दिनेश दांडगे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.