आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक:अग्निवीर सैन्यदलात भरती झालेल्या शुभम पंडितची मिरवणूक

जाफराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील युवक शुभम रमेश पंडित याने सलून व्यवसाय सांभाळून सैन्यदलात भरती होऊन देशसेवा करण्याचे ध्येय उराशी बाळगून तशी तयारी सुरु केली. जिद्द, धाडस, चिकाटीवर जोरावर यश मिळवले. या यशानंतर त्याची जाफराबाद शहरात नागरिकांनी ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढली.

औरंगाबाद येथील छावणीत अग्नीवीर म्हणुन सैन्य दलात भरती निघाली असता शुभमने ग्राऊंड मधील रनींंग, लांबउडी, उंचउडी, वजन, उंची, छाती, मेडीकल यासह सैन्य दलात आवश्यक असलेल्या बाबी यशस्वीपणे पुर्ण केल्या. २७ नोव्हेंबर रोजी लागलेल्या लेखी परीक्षेतही तो उत्कृष्ट गुणाने पास झाल्याचे कळताच कुंटुंबीयांसहीत मित्रपरिवाराने आनंद व्यक्त केला. ३० नोव्हेंबर बुधवार रोजी त्याचे पुणे येथुन जाफराबाद शहरात आगमन होताच बसस्थानकापासुन ते त्यांच्या निमखेडा रोड येथील निवासस्थापर्यंत ढोल ताशा, नगाऱ्याच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी करीत मिरवणुक काढण्यात आली. जाफराबाद शहरातील मुख्य मार्गावरुन काढण्यात आलेल्या मिरवणुकीत माजी सैनिक संघटना जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर भोपळे, आदर्श शेतकरी राजु वाकडे, जगननाथ भोपळे, संजय ढवळे, विशाल वाकडे, रमेश बोर्डे, रमेश पंडीत, नाभिक युवा अध्यक्ष विजय बोर्डे, सचिन पंडीत, भरत पंडीत, मधुकर देशमुख, स्वप्निल पंडीत, विनोद बोर्डे, दिपक पंडीत, कृष्णा अंभोरे, विठ्ठल वरपे, किशोर गाडेकर, संजय बिडवे, धनजंय ढवळे, गणेश ढवळे, गोमु ढवळे, आकाश ढवळे, अभिषेक सुरडकर, राहुल गवई,आकाश हिवाळे यांची उपस्थिती होती. यावेळी युवकांनी भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान या गगनभेदी घोषणा दिल्या.

यावेळी माजी सैनिक नंदकिशोर भोपळे म्हणाले, आजच्या तरुणांनी उचित ध्येय मनात ठेवुन त्या दिशेने वाटचाल करावी यासाठी वाटेल तेवढे परिश्रम करण्याची मनात इच्छा बाळगावी यात निश्चितच एक ना एक दिवस ध्येय प्राप्ती होते. म्हणुन तरुणांनी देश भक्तीची भावना मनात बाळगुन सैन्यात भरती व्हावे, देशसेवा समाजसेवा, मानवसेवा करावी. शुभम पंडीत यांच्या निवडीबद्दल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे, माजी आमदार चंद्रकांत दानवे, सुरेश दिवटे, रामधन कळंबे, नगराध्यक्षा डाॅ. सुरेखा लहाने, रामभाऊ छडीदार, सुधाकर दानवे, विजय परीहार, संतोष लोखंडे, सुरेश गवळी, दिपक वाकडे, मयुर बोर्डे, कमल काशिकर, राजु बोराडे, संजय छडीदार, नगरसेवक अनिल बोर्डे, दामोधर वैद्य, प्रेम देशमुख, गोलु देशमुख, नाना पंडीत, संदिप सोळंके यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे

बातम्या आणखी आहेत...