आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पन्न:आंतरपिकातून घेतले ३५ क्विंटल मेथीचे उत्पादन

दानापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील वडशेद येथील शेतकरी शरद आगलावे शेतातील कापूस पिकात मेथी टाकून केवळ ३० दिवसात अंतरपीकातून ३५ क्विंटल उत्पादन काढले आहे. यातून त्यांना एक लाख ३५ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे.

भोकरदन तालुक्यात समाधानकारक पाऊस आहे. गत दोन वर्षात वार्षिक सरासरी पेक्षाही अधिक पाऊस झाला यामुळे पाण्याची उपलब्धता आहे. पाण्याचे नियोजन, आधुनिक शेती पद्धतीचा वापर आणि शेतात घ्यावयाचे कष्ट या बळावर वडशेद येथील प्रगतशील शेतकरी शरद आगलावे हे नेहमी आपल्या शेतीत विविध प्रयोग राबवतात. आगलावे यांनी दीड एकरात कापूस पेरला होता यामध्ये त्यांनी मेथीचे आंतरपीक घेतले त्यांनी त्यात एक क्विंटल २० किलो मेथी बियाणाचा पेरा केला. पेरणीनंतर योग्य वेळी मशागती फवारणी केल्या परिणामी ३० दिवसांमध्ये मेथी पीक काढण्यासाठी आले. या मेथीला चाळीस रुपये किलो प्रमाणे भाव मिळाला एकूण ३५ क्विंटल मेथीतून जवळपास १ लाख ३५ हजार रुपयाचे उत्पन्न मिळविले.

विशेष म्हणजे कापूस पेरणीसाठी केवळ बियाण्यावर त्यांचा खर्च झाला आहे. मेथीच्या फवारणी मशागतीतच कपाशीवर देखील फवारणी आणि मशागत झाली. दरम्यान, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना फटका बसत असून केवळ एकच पीक न घेता वेगवेगळी पिके घेऊन शेतकऱ्यांनी आपली आर्थिक उन्नती साधने गरजेचे आहे. शेतीला आधुनिकतेची जोड देऊन विविध प्रयोग करावे, असे शेतकरी शरद आगलावे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...