आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनंदन:प्रा.डॉ.प्रमोद कुमावत यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

वडीगोद्री14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक येथील डॉ. प्रा. प्रमोद कुमावत यांना लायन्स क्लब ऑफ औरंगाबादच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार १० सप्टेंबर रोजी प्रदान करण्यात आला आहे. हा कार्यक्रम औरंगाबाद येथील हाॅटेल द वन येथे आयोजित करण्यात आला होता.हा पुरस्कार औरंगाबाद येथील सुप्रसिध्द युराॅलाॅजिस्ट डॉ.पुरूषोत्तम दरक यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

यावेळी लायन्स क्लब औरंगाबादचे अध्यक्ष संजयजी मंत्री, सचिव जगदीश सारडा, नंदकिशोर मालपाणी, चंद्रकांत मालपाणी, संयोजक डॉ सतिश सुराना उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबादचे संचालक, डॉ. कलिमोद्दीन शेख, डॉ. विशाल तायडे, डॉ. सुनिता राठोड, डॉ. महादेव हंडाळ, डॉ. माधुरी दलाल, डॉ. प्रकाश मान्टे, चैतन्य साधना ॲन्ड रिसर्च फाउंडेशनच्या सचिव डॉ. जयश्री किनारीवाल, सुधाकर तरटे, सिताराम आहेर, अनिरुद्ध किनारीवाल, राजू छल्लारे आदींनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...