आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज दाखल:अधिसभेसाठी प्रा. बनसोडे यांचा अर्ज दाखल

जाफराबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील सिध्दार्थ महाविद्यालयाचे सायन्स विभागाचे प्राध्यापक निवृत्ती बनसोडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे अधिसभा सदस्य पदासाठी नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी प्रा. सिद्धार्थ पैठणे, महाविद्यालयातील कर्मचारी अनिल साळवे, रिसेन्द्र मानकर व सुधीर बनकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

बनसोडे म्हणाले की, पदवीधरांचे विविध मागण्या प्रश्न तथा समस्या प्रलंबित अाहेत. त्या सोडविण्यासाठी मी कटीबध्द आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांची मला जाण असल्याने गेल्या अनेक वर्षापासून माझा शैक्षणिक चळवळीत सहभाग आहे. तर याआधी मी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात विविध आंदोलने, निवेदने, निदर्शने करीत शासन तथा प्रशासनाचे लक्ष वेधले अाहे, यापुढेही मी पदवीधरांच्या न्याय व हक्कासाठी लढत राहील, तरी २६ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांच्या निवडणुकीत मला आपलं अमूल्य मत देऊन प्रचंड मताधिक्याने निवडून आणून मला सेवेची संधी द्यावी,असे अवाहनही त्यांनी केले. या वेळी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक तथा पदवीधरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा सदस्याचे नामांकन अर्ज सादर करताना प्रा.निवृत्ती बनसोडे प्रा. सिध्दार्थ पैठणे आदींची यावेळी उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...