आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:प्रा. शा. सारवाडी येथे शास्त्रज्ञ सी.व्ही. रमण यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

जालना14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२१ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारवाडी येथे नोबल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रमण यांचा स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ प्राथमिक पदवीधर शिक्षक ज्ञानेश्वर गिराम हे होते.

यावेळी अध्यक्षांच्या हस्ते सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पदवीधर शिक्षक अनंतकुमार शीलवंत यांनी रमण यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. अध्यक्षीय भाषणात ज्ञानेश्वर गिराम यांनी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा असे आवाहन करून रमण यांच्या जीवन कार्यातील काही प्रसंग सांगितले. या कार्यक्रमासाठी चक्रधर बागल, जनाबाई भुंबे, दीपा उंचेकर आणि शाळेतील विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...