आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवागौरव:प्राध्यापक अच्युत मगर यांचा सेवानिवृत्तीबद्दल सेवागौरव

मंठा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा.अच्युत मगर यांना सेवानिवृत्तीनिमित्ताने नुकतेच सेवागौरव करून निरोप देण्यात आला. कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव कपिल आकात, प्राचार्य.डॉ. माणिकराव थिटे, उपप्राचार्य डॉ. सुधाकर जाधव, डॉ. सदाशिव कमळकर, प्रा. अशोक खरात, मुख्याध्यापक बाबासाहेब ताठे, प्रभाकरराव लिखे, अंकुशराव मोरे, रमेशराव ढवळे आदी प्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले, तर प्रा.मगर यांचा जोडआहेर देवून सपत्नीक सत्कार करण्यात आला. नागेश मगर यांनी तयार केलेला ले-स्टॉड महाविद्यालयास देण्यात आला. याप्रसंगी कवी तथा गायक वसंत सूर्यवंशी यांनी सेवागौरव गीत सादर केले. प्रा.अच्युत मगर म्हणाले की, स्व.वैजनाथराव आकात आणि स्व. बाबासाहेब आकात यांनी मला संस्थेत काम करण्याची संधी दिली. यामुळेच सेवाकाळात अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे पवित्र कार्य करता आले. कपिल आकात यांनी अध्यक्षीय भाषणात प्रा.मगर यांच्या कार्याचा गौरव केला.

प्रास्ताविक उपप्राचार्य संभाजी तिडके यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.चारुलता पाटील यांनी केले. सेवागौरव पत्राचे वाचन प्रा.मनोज मस्के यांनी केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. माणिकराव थिटे, डॉ.तुषार मगर आणि डॉ.तृप्ती मगर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमासाठी रामराव जाधव, दशरथराव देवडे, नानासाहेब घाटूळ, बाबासाहेब बागल, त्रिंबकराव घारे, संजय बोराडे, कैलास घोगरे, शिवाजीराव जाधव, नारायणराव मोरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...