आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातरूणांनी करिअर करत असताना धाडस केल्याशिवाय पर्याय नाही, व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर धाडस करावेच लागते त्यासाठी सर्वप्रथम व्यवसाय निवड, त्यातील धोके व त्याला मिळणारा प्रतिसाद याची सांगड घातली तर प्रगती होतेच असे प्रतिपादन ॲड. राहुल नावंदर यांनी केले. पाथ्रीकर कॅम्पस येथील निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्ट संचलित इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट (एम.बी.ए.) विद्यार्थ्यांसाठी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. देवेश पाथ्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसायभिमूख व्यवसाय निवड व तयारी कशी करावी या विषयावर ॲङ राहुल नांवदर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. .
या वेळी मॅनेजमेंट विभागाचे डायरेक्टर डॉ. शेख आबेद, फार्मसी विभागाच्या प्राचार्या डॉ. स्वाती रावत, प्रा. सुनिल जायभाये, अनिल सपकाळ, टिंवकल स्टार स्कूलच्या मुख्याध्यापिका निशिगंधा देशमुख आदींची उपस्थिती होती. ॲड. नावंदर म्हणाले, व्यवसाय निवडताना प्रोफेशनल व्यवसाय निवडावा त्यासाठी बाजारपेठ, त्याला लागणारे मनुष्यबळ आदीची पाहणी करावी. सध्याच्या युगात समाजमाध्यमांचा (सोशल मिडिया) बोलबाला आहे या समाजमाध्यमाचा वापर आपण आपल्या करिअर व व्यवसायासाठी केला तर यश आणखी जवळ येते.
करिअर निवडताना खबदारी घेण्याबरोबरच योग्य व्यक्तींचा सल्ला घेण्याची ही गरज असते. या साठी पाथ्रीकर कॅम्पस येथील अनेक शिक्षक तत्पर असतात त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन घेऊन करिअर निवडले तर तुम्हाला यशस्वी होण्याची गुरूकिल्लीच येथे मिळेल. सूत्रसंचलन प्रा. कोमल बरडिया यांनी तर डायरेक्टर डॉ. आबेद शेख यांनी आभार मानले. या व्याख्यानात ॲङ नावंदर यांनी विद्यार्थ्यांना करिअरची सुरुवात करताना येणाऱ्या अडचणी व त्यावर कशी मात करावी या विषयी सदोहारण मार्गदर्शन केले. यशस्वी करण्यासाठी कल्याण देवकते, चेतन निरखे, मानिका इवरकर, बारावके पल्लवी आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.