आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढावा:प्रकल्प संचालकांची बालिका विद्यालयास भेट; विद्यार्थिनींच्या गुणवत्तेबाबत केले मार्गदर्शन

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयास महाराष्ट्र राज्य प्रकल्प संचालक पगारे यांनी भेट देऊन विद्यालयात सुरु असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. आढावा घेतल्यानंतर त्यांनी विद्यार्थिनींच्या गुणवत्तेबद्दल मार्गदर्शन करीत मूलभूत क्षमता विकसित करण्यासाठी विविध उपाय सुचवले.

विविध अनुदानाचा विनियोग करताना पूर्णपणे योजना यशस्वी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. मुलींच्या शिक्षणाबरोबरच सुरक्षा, तसेच आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे आवाहन केले. मूलभूत अध्ययन क्षमता प्राप्त करून देण्यासाठी विविध उपक्रमांची अंमलबजावणी शाळांनी केली पाहिजे, असेही पगारे यांनी सांगितले.

यावेळी शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ, उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, गटशिक्षणाधिकारी प्रदिप जनबंधु, विनया वडजे, सहायक कार्यक्रम अधिकारी शिंदे, मावकर, गट समन्वयक बाबासाहेब जुंबड, ठाकुर, बर्डे, ढवळे, विलास राजगिरे, विकास पोथरे, मुख्याध्यापिका गवई, गांगे, अल्हाट यांच्यासह विद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...