आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंस्कृत भाषा शिकण्याचे जे फायदे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. संस्कृत भाषेचे शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीची उच्चार प्रणाली ही इंग्लिश, मराठी, हिंदी किंवा इतर भाषेमध्ये असो ती सुस्पष्ट असते, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ जालनाचे डीजीएनडी डॉ. सुरेश साबू यांनी केले.
संस्कृत भाषा प्रचार समिती, जालना संचालित श्रीराम संस्कृत विद्यालय, ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत दिनानिमित्त आयोजित दहा दिवसीय शालेय संस्कृत पाठांतर स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी गटशिक्षण अधिकारी आसावरी काळे, शिक्षण विस्तार अधिकारी गीता नाकाडे, श्रीराम वाचनालयाचे अध्यक्ष कैलास बियाणी, सचिव श्रीकांत शेलगावकर, स्पर्धा परीक्षक जयश्री कुलकर्णी यांची उपस्थिती होती. डॉ. साबू म्हणाले, संस्कृत भाषा प्रचार समितीने आयोजित केलेल्या संस्कृत स्पर्धा उपक्रमाला २५ वर्ष पूर्ण होत आहे त्याबद्दल त्यांनी संस्थेचे कौतुक केले. संस्कृत विषय सुंदर आहे. संस्कृत भाषेवर आपल्या हिंदू संस्कृतीचा पाया असल्यामुळे संस्कृत भाषा सर्वाना आली पाहिजे. रोटरी क्लबच्या माध्यमातून संस्थेस सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. गटशिक्षणाधिकारी आसावरी काळे म्हणाल्या, दरवर्षी संस्कृत भाषेची स्पर्धा आयोजित करून संस्था विद्यार्थांना अभ्यास, अध्ययन करण्यासाठी प्रोसाहान देत आहे ही स्तुत्य गोष्ट आहे. संस्कृत भाषेतील सुभाषितामध्ये सुंदर अर्थ दिलेला असतो कोणताही बोध किंवा मतीतार्थ सांगताना अत्यंत सुंदर उदाहरण देऊन खूप छान प्रकारे वर्णन केलेलं असते असे शब्द की जे आपल्याला सतत ऐकत राहावे वाटते त्यामुळे संस्कृत भाषातील सुभाषिते खूप आवडतात. संस्कृत भाषेमध्ये विपुल प्रमाणात साहित्य आहे.
विद्यार्थांनी संस्कृत भाषा शिकतांना त्यातील अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला दिला. गीता नाकाडे यांनी जीवनामध्ये काय योग्य काय अयोग्य, कस जीवन जगाव हे दाखवणारी संस्कृत भाषा आहे. संस्कृत भाषा सर्वात जुनी प्राचीन भाषा असून सर्व भाषांची मातृभाषा आहे. संस्कृत मधील सुभाषितामधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळते. संस्कृत मधील विद्या दधाति विनयं या सुभाषिताचा त्यांनी विद्यार्थांना अर्थ समजून सांगितला. ११ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या बालक मंदिर ते इयत्ता १० वी या वर्गासाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी एकूण ५६४ शालेय विद्यार्थांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन शाम शेलगावकर यांनी तर कैलास बियाणी यांनी आभार मानले. याप्रसंगी नयन पेडगावकर, कावले, सावित्रा बिल्हारे, सय्यद युनूस, शैलेन्द्र बदनापूरकर, प्रमोद जोशी, मोहिनी शेलगावकर उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.