आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गरोदरपणात योग्य व्यायाम, संतुलित आहार महत्त्वाचा

परतूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरोदरपणात संतुलित आहार अधिक महत्वाचा आहे.गरोदरपणात मातेचे वजन ८ ते १२ किलोग्रॅमने वाढलेले असावे, यासाठी प्रत्येक मातेने आपल्या वजनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. गरोदरपणात प्रत्येक मातेला ४०० किलोग्रॅम कॅलरी आहार जास्त घेणे गरजेचे आहे. प्रथिने २३ ग्रॅम जास्तीचे घेणे आवश्यक आहे. प्रथिने हे तुरीची दाळ, दुध, अंडी व मोड आलेली धान्ये यामध्ये जास्त असते. यासाठी मातेने हे प्रमाण जेवणामध्ये घेणे गरजेचे आहे. संतुलित आहारा बरोबरच योग्य व्यायाम देखील तितकाच महत्वाचा असल्याचे मत डॉ.संदीप चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

कृष्णा हॉस्पिटल व इमर्जन्सी केअर सेंटरच्या वतीने तालुक्यातील श्रीष्टी येथे शनिवारी गरोदर मातांच्या मोफत तपासणी शिबिराचे उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. शिबीराला सरपंच जितू अंभुरे, डॉ. केशव पाईकराव, डॉ. हनुमान खंदारे, डॉ. भाग्यश्री खंदारे, डॉ. वैभव घोडके यांची उपस्थिती होती. प्रत्येक मातेने आपले हिमोग्लोबीन दर तीन महिन्यांनी तपासणे आवश्यक आहे. हिमोग्लोबीन हे नेहमीकरिता ११ ग्रॅमच्यावर असणे गरजेचे असते. लघवीमध्ये प्रोटीन अल्बोमीन बघण्याकरिता लघवीची तपासणी करून अल्बोमीन लघवीमध्ये आहे का हे तपासून घेणे गरजेचे असते. लघवीमध्ये अल्बोमीनचे प्रमाण जास्त असल्यास गरोदरमातेच्या पायावर, अंगावर सूज येण्याची शक्यता असते. प्रत्येक मातेने आपले रक्तदाब तपासून घ्यावे, रक्तदाब १२०/८० असावा. प्रत्येक मातेने बाळाच्या हालचालीकडे लक्ष ठेवावे. बाळाची हालचाल १८ आठवड्यानंतर मातेला माहिती पडते, तरी मातेने पाच महिन्यानंतर बाळाची हालचाल बघावी.

जर बाळाची हालचाल होत नसल्यास गर्भाशयातच बाळ मृत होण्याची शक्यता असते. अशी स्थिती उद्‌भवल्यास तत्काळ जवळच्या वैद्यकीय अधिकाऱ्याना दाखवावे किंवा सोनोग्राफी करुन घ्यावी. गरोदरपणात तीन ते पाचवेळा तपासणी करावी. पहिली तपासणी तिसऱ्या महिन्यात, दुसरी तपासणी १८-२० आठवड्यात तिसरी तपासणी सातव्या ते आठव्या महिन्यात आणि पुढे दर महिन्यांनी किंवा १५ दिवसांनी करायला हवी. योग आणि व्यायाम गर्भवती महिलांना मानसिक व शारीरिकदृष्ट्या कणखर व सशक्त बनवत असतो. रोग प्रतिकारशक्ती वाढते. असेही डॉ. चव्हाण म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...