आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांनी रविवारी रात्री तीन घरे फाेडली:पीएसआयचे घर फोडून 10  लाखांचा मुद्देमाल लंपास

जालना/अंबड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड तालुक्यात चोरट्यांनी रविवारी रात्री तीन घरे फाेडली. यात अंबड येथील पीएसआयचेही घर फोडले. पीएसआय रात्री ड्यूटीवर होते, तर त्यांचे कुटुंब महालक्ष्मी सणासाठी गावाकडे गेले होते. घरात कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी चॅनल गेट तोडून आत प्रवेश करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह १० लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला.

अंबड ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक मधुकर त्र्यंबकराव पाटील हे कार्यरत आहेत. दरम्यान, रविवारी रात्री हे पेट्रोलिंगवर गेले होते, तर कुटुंब महालक्ष्मीचा सण असल्यामुळे गावाकडे गेले होते. घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचे चॅनल गेटसह मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत घुसून कपाटातील ८ लाख ७५ हजार रुपयांचे दागिने, १ लाख ८० हजार रुपयांची रोख रक्कम असा १० लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला, अशी नाेंद पाेलिस तक्रारीत आहे. दरम्यान, चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केला जात आहे.

२ घरांचे कडीकोयंडे तोडले अंबड तालुक्यातील बोरी येथे दोन घरांचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा ६ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला, अशी तक्रारीत नाेंद आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...