आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:खासदार राहुल गांधी यांच्यावरील ‘ईडी’ चौकशीचा निषेध; युवक काँग्रेसने घोषणा

जवळा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावरील ईडी चौकशीच्या विरोधात आर्णी- केळापूर मतदार संघामध्ये युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष स्वानंद चव्हाण यांच्या नेतृत्वात दि. १७ जून रोजी सायंकाळी ८ वाजता आर्णी केळापूर मतदार संघामध्ये मशाल रॅली काढून जोरदार निदर्शने देऊन केंद्रातील भाजप सरकारचा निषेध केला.

युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष स्वानंद चव्हाण यांच्या नेतृत्वात दि. १७ जून रोजी झालेल्या आंदोलनामध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी हजर होते. “सरकार जब भी डरती है” ईडी को आगे करती है” या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय “राहुल जी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, या गगनभेदी घोषणेने परिसर दणाणला राहुल गांधी यांना ई डी चौकशीच्या फेऱ्यात अडकवून भाजप सरकारच्या दडपशाही धोरणाविरोधात १७ जून रोजी सायंकाळी आठ वाजता यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी केळापूर विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करून मशाल रॅली काढण्यात आली.

त्यावेळी रॅलीला काँग्रेसचे नेते स्वानंद चव्हाण यांनी संबोधित केले. यावेळी यांनी जुलमी मोदी सरकारच्या काळ्या कारणामाची पोलखोल करीत या सरकारला येणाऱ्या निवडणुकीत याची किंमत मोजावी लागेल असे सांगितले. व युवकांना गावा - गावात जाऊन काँग्रेस मजबूत करण्याचे आवाहन केले. त्यावेळी मोर्चा मध्ये युवक काँग्रेसचे सर्व नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

बातम्या आणखी आहेत...