आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:राज्यपाल कोश्यारी यांचा जाफराबाद शहरात निषेध

जाफराबा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य करणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपा चे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांचा जाफराबाद तालुक्यातील सकल मराठा समाज व शिवप्रेमी बांधवांकडून निषेध करण्यात आला. नायब तहसीलदार केशव डकले यांना निवेदन दिले.

राज्यपाल कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते त्रिवेदी यांनी आपले शब्द मागे घ्यावे कारण छत्रपती शिवाजी महाराज कधीच औरंगजेबापुढे झुकले नाही तर आग्र्यास जेव्हा छत्रपती शिवरायांना कैद झाली तेव्हा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांनी माफी न मागता औरंग्याच्या हातावर तुरी देऊन महाराजांची सुटका केली. असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी रमेश गव्हाड, रामधन कळंबे, सुरेश गवळी, ज्ञानेश्वर शिंदे, उत्तम वानखेडे, एकनाथ शेवत्रे, विशाल वाकडे, प्रभाकर गाढे, योगेश वाकडे, प्रमोद फदाट, उत्तम उगले, सुनिल भोसले, दत्ता भोपळे, उमेश भोपळे, समाधान सरोदे आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...