आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:ठाकरे गटाकडून राज्यपालांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

जालना14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपालांच्या शिवरायांवरील वक्तव्याचा जालना येथे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी निषेध केला. शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत रोष व्यक्त केला. राज्यपालांची हकालपट्टी करावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

राज्यपालांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी सभारंभादरम्यान शिवरायांच्या विरोधात वक्तव्य केले. त्यामुळे शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान शिवसेनेच्या ठाकरे गटाने राज्यपालांची राज्याबाहेर हकालपट्टी करण्याची मागणी करत निषेध केला. यावेळी शहर प्रमुख बाला परदेशी, शहर प्रमुख दुर्गेश काठोठीवाले, शिवाजी शेजुळ, विजय पवार, संदीप नाईकवाडे, अंकुश पाचफुले, किशोर नरवडे, चेतन भुरेवाल, अनिल अंभोरे, विनोद गड्डम, सोनु मेघावाले आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...