आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहावितरण ही सेवा देणारी कंपनी आहे. अशा वीज सेवेच्या क्षेत्रातील लाईनमन हा महावितरणचा चेहरा आहे. घरोघरी प्रकाश देणारा दुवा असल्याने लाईनमनने आपल्या सुरक्षेला प्राध्यान्य देत ग्राहकाभिमूख सेवा देण्याच काम करत कंपनीच्या आर्थिक स्थैर्यासाठी संपुर्ण कार्यक्षमतेने कार्यरत रहावे, असे प्रतिपादन भोकरदन महावितरणचे प्रभारी उपअभियंता प्रदीप दारकोंडे यांनी केले. भोकरदन येथे लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रत्नमाला लॉन्समध्ये लाईनमन दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कनिष्ठ अभियंता प्रदीप सातदिवे, मयुर बुलगे, गोसावी, प्रदिप गावंडे, वर्कर्स फेडरेशन संघटनेचे एन. जी.जाधव, संतोष मिसाळ, संदिप कोल्हे, रवि वाघ, केशव पगारे आदींची उपस्थिती होती.
दारकोंडे म्हणाले, ग्राहकांसोबत थेट संबंध असलेला कर्मचारी म्हणजे लाईनमन आहे. त्यामुळे लाईनमनच्या वागणुकीवरच कंपनीची प्रतिमा ठरत असते. कोरोना काळात जीवावर उदार होत लाईनमननी दिलेली सेवा ही गौरवास्पद आहे. एकप्रकारे कोरोना यौध्दाचेच काम आपण केलेले आहे. अखंडित वीज पुरवठयासोबतच थकबाकी वसुली हे सुध्दा मोठे आव्हान आहे. मला माहीत आहे, सकाळी आठ वाजता घराबाहेर पडलेला माझा लाईनमन रात्री उशिरा पर्यंत कार्यरत असतो. मागील काही काळात शंभर टक्कयांपेक्षा जास्त वीजबील वसुलीचे काम आपण केलेले आहे.
पुढील काळातही मंडळाची वसुली क्षमता वाढवायची आहे. त्यादृष्टीने नियोजनबध्द काम करत सांधिक कार्यालयाने दिलेले लक्ष्य साध्य करायचे आहे, असे सांगत वीजयंत्रणेवर काम करत असताना सुरक्षा साधनांचा वापर करत वीजसेवा बजावावी असे आवाहन केले. सुत्रसंचलन एम.जी.जाधव यांनी तर आर. एस. जाधव यांनी आभार मानले. यावेळी लाईनमन विष्णू इंगळे, स्वप्निल जोशी, भास्कर नामदे, विनोद नामदे, गजानन देवरे, दिपक देवरे, विशाल दांडगे, बरडे उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.