आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिके संशोधन केंद्र:बदनापूर येथे राष्ट्रीय डाळ वर्गीय पिके संशोधन केंद्र द्या

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे राष्ट्रीय दाळ वर्गीय पिके संशोधन केंद्र स्थापन करावे, अशी मागणी मराठवाडा अनुशेष निर्मूलन आणि विकास मंचाचे अध्यक्ष डॉ. संजय लाखे पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली आहे.

जालना येथे सुरू असलेल्या गणेश फेस्टिव्हलला कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थिती लावली. यादरम्यान डॉ. संजय लाखे पाटील यांनी नामदार अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन त्यांना उपरोक्त विषयाचे निवेदन सादर केले. यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी मंत्री प्रा. सुरेश नवले, गणेश फेस्टिव्हलचे पदाधिकारी उपस्थित होते. औरंगाबाद शहरातील हिमायतबागेत शासनाची हजारभर एकर जमीन पडून आहे,

याठिकाणी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे उपकेंद्र- कृषी महाविद्यालय उभारून सर्व प्रकारचे कृषी अभ्यासक्रम तातडीने सुरू करावे. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे डाळवर्गीय पिके संशोधन केंद्र तातडीने मंजूर करावे. शेती- शेतकरी आपत्तीग्रस्त नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये बंधनकारक मदतीसाठी एन. डी. आर. एफ व एस. डी. आर. एफच्या निकषांच्या केंद्र शासनाच्या आदेशाची मुदत ३१ मार्च २०२० रोजी संपली आहे. दरम्यान, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी हिमायतबाग औरंगाबाद येथे कृषी महाविद्यालय आणि कृषी विद्यापीठ उपकेंद्र स्थापन करण्यासाठी लवकर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...