आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:अर्बन हॉर्टिकल्चर, छतावरील शेतीबाबत‎ शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे ; डॉ. इंद्रमणी‎

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांचे‎ जीवन समृद्ध करण्यासाठी कृषी क्षेत्रातील सर्व‎ कर्मचारी, अधिकारी, प्राध्यापक व शास्त्रज्ञ यांनी‎ शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी असणे गरजेचे आहे.‎ भविष्यात कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांची‎ भूमिका शेतकऱ्यांसाठी फार महत्वाची आहे.

या‎ सर्वच घटकांनी अर्बन हॉर्टीकल्चर व छतावरील‎ शेतीबाबत प्रशिक्षण देऊन हा व्यवसाय वाढवावा,‎ असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि‎ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी केले.‎ कृषि विज्ञान केंद्र, खरपुडी, जालना येथे कृषि‎ विस्तार कार्यकर्त्यांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण‎ घेण्यात आले.

यावेळी कुलगुरू डॉ. इन्द्रमणी हे‎ प्रमुख अतिथी म्हणून बाेलत हाेते. अध्यक्षस्थानी‎ कृषिरत्न विजय अण्णा बोराडे होते. यावेळी‎ कृषिभूषण भगवान राव काळे, संचालक विस्तार‎ शिक्षण डॉ. डी. बी. देवसरकर, कुलसचिव डॉ. ‎धीरज कदम, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस.‎ व्ही. सोनुने यांची प्रमुख उपस्थिती होती.‎ अध्यक्षीय भाषणात विजयअण्णा बोराडे म्हणाले‎ की, नफ्याची शाश्वती बघून भाजीपाल्याची‎ निवड करावी. भविष्यात कर्टुली या पिकाला ‎व्यावसायिक स्वरूपात पुढे आणणे गरजेचे आहे. शेतीकामात महिलांचा वाट हा ८० टक्के आहे.‎ भेंडी हे योग्य भाव असलेले वर्षभर घेण्यायोग्य शाश्वत पीक आहे असे ते म्हणाले.‎ प्रमुख भाजीपाला पिकाविषयी प्रा. सुनील कळम ‎यांनी, प्रा. बी. वाय.कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

छतावरील भाजी लागवड या विषयावर नंदकिशोर‎ पुंड यांनी माहिती दिली. अजय मिटकरी यांनी‎ कीड व रोग व उपाय यावर मार्गदर्शन केले. भाजी‎ पाल्यातील पाणी व्यवस्थापन या विषयावर कृषी‎ अभियंता पंडित वासरे, भाजीपाला प्रक्रिया यावर‎ शशिकांत पाटील यांनी, पोषण बाग लागवड‎ संकल्पनेवर संगीता कऱ्हाळे यांनी मार्गदर्शन केले.‎ शेतकरी ज्ञानेश्वर शेंद्रे, यांनी विदेशी भाजीपाला‎ लागवड या विषयी माहिती दिली. राहि बाई कचरे‎ यांनी देशी भाजीपाला लागवड व बीज संग्रहण व‎ जतन या विषयी अनुभव सांगितले. सूत्रसंचलन‎ सुनील कळम यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...