आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉर्निंग वॉकला गेलेल्या पीएसआयचा झाला मृत्यू:मैदानावर व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका

जालना6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सकाळी मैदानावर व्यायाम करण्यास गेलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. सय्यद अहमद असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते शहरातील चंदनझिरा ठाण्यात कर्तव्यावर होते.

सय्यद अहमद यांना सहा महिन्यांपूर्वीच पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली होती. तेव्हापासून ते चंदनझिरा पाेलिस ठाण्यात कार्यरत होते. बुधवारी ते नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी रेल्वेस्थानक परिसरातील मैदानावर गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचे काही मित्र आणि पाेलिस दलातील सहकारी होते. व्यायाम करून घरी परतत असतानाच त्यांच्या छातीत वेदना सुुरू झाल्या. त्यानंतर ते खाली कोसळले.

१५ दिवसांतील तिसरी घटना १५ दिवसांपूर्वी मॉर्निंग वॉकला गेलेले हेड कॉन्स्टेबल संजय गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी पोलिस कर्मचारी संजय जाधव यांचाही मृत्यू झाला. त्यापाठोपाठ बुधवारी सय्यद अहमद यांचा मृत्यू झाल्याने पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...