आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यास भेट:मानसशास्त्र प्रत्यक्ष जगण्याचा विषय; मनोविकारतज्ज्ञ डॉ. आंबेकर यांचे प्रतिपादन, विद्यार्थ्यांशी संवाद

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यार्थ्यांना मानसशास्त्र विषय हा केवळ अभ्यासाचा विषय नसून तो प्रत्यक्ष जगण्याचा विषय आहे. तसेच महत्त्वाचा विषय झाला असल्याचे मनोविकार तज्ञ डॉ. प्रकाश आंबेकर यांनी सांगितले.

अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना येथील मानसशास्त्र विभाग आणि समुपदेशन केंद्र यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून मानस हॉस्पिटल जालना येथे भेट देण्यात आली आहे. या वेळी विद्यार्थ्यांनी कार्यप्रणाली, विविध उपचार पद्धती सुविधांचा अभ्यास केला. या वेळी डॉ. आंबेकर बोलत होते.

या वेळी डॉ. सुजाता देवरे, डॉ. शांताराम रायपुरे, मनोज लोणकर, सतीश खरटमल, डॉ. रामकिसन बेलनर, डॉ. विलास वरखडे आदींची उपस्थिती होती. यावेळी डॉ. आंबेकर यांनी यूजीसीच्या नवीन धोरणामुळे मानसशास्त्रातील नवीन संधी विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. डॉ. सुजाता देवरे यांनी मुलांना समुपदेशन हा संदर्भात माहिती दिली. योगा मार्गदर्शक मनोज लोणकर यांनी मुलांना योगाचे महत्व फायदे आणि प्रात्यक्षिक करुन दाखवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालिनी बोर्डे यांनी तर भक्ती हिस्वनकर यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...