आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती रॅली:टेंभुर्णी येथे शालेय विद्यार्थिनींनी काढली स्त्रीभ्रूणहत्या संदर्भात जनजागृती रॅली

टेंभुर्णी22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी शहरातील मानाचा गणपती बाप्पा म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री संत सावता गणेश मंडळाच्या वतीने मंगळवारी शहरातील विविध भागातून स्त्रीभ्रूणहत्या संदर्भात रॅली काढण्यात आली.

रॅलीत आशा सेविका रेखाताई धनवाई, सपोनि रविंद्र ठाकरे, सरपंच प्रतिनिधी गौतम म्हस्के, रावसाहेब अंभोरे, संत सावता मंडळाचे अध्यक्ष संभाजी जमधडे, माळी महासंघाचे तालुकाध्यक्ष संजय राऊत, संदीप मुळे, कैलास मगर शंकर मुळे, दीपक जमधडे, गणेश सातभाई, राष्ट्रवादीची युवा कार्यकर्ते रवि खरात, सागर सांगुळे, सतिष खाडेभराड गणेश कुदळे बबनराव जमधडे संतोष खाडेभराड सखाराम ढवळे किरण खैरे योगेश जमधडे संतोष सांगुळे दिनेश जाधव संतोष मैंद, मयुर मगर ,पवन झोरे, अविनाश खरात, मुकुदा बारगुडे, शुभम खरात, राजेश शेवाळे, आकाश चंदनशिवे, वायाळ, आंधळे यांच्यासह अंगणवाडी सेविका, कार्यकर्ती, शिक्षिका ज्योती कळंबे, मंजुषा भिलावेकर, मल्हारी उमप आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे यांनी मुलगी वाचवा मुलगी शिकवा स्त्री भ्रूणहत्या थांबवा अशा घोषणा दिल्या. तर संत सावता गणेश मंडळाच्या वतीने स्त्री भृण हत्या संदर्भात रॅली काढून जनजागृती करण्यात आल्याने या माध्यमातून जनजागृती होते स्त्री भृण हत्या होणार नाही यासाठी सर्वांनी जागृत राहणे गरजेचे आहे असे मत सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांनी व्यक्त केले. ही रॅली संत सावता मंगल कार्यालयातून बाजार गल्ली, मुख्य बसस्थानक, मेन रोड, गांधी चमन, मारवाडी गल्ली, जिरे गल्ली, देशमुख गल्ली, ब्राह्मण गल्ली या मार्गे जाऊन संत सावता मंगल कार्यालयात विसर्जित करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...