आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती उपक्रम:बैलगाड्यांचा अपघात टाळण्यासाठी जनजागृती

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना जिल्ह्यात विविध रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच रात्रीच्या बैलगाड्यांद्वारे उसाची वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते. या बैलगाड्यांना वाहने धडकून अपघात होण्याचेही प्रमाणही वाढले आहे. दरम्यान, हे अपघात राेखण्यासाठी आरटीओ विभागाकडून जनजागृती केली जात आहे.

जालना जिल्ह्यात असलेल्या अंकुशनगर साखर कारखाना, महाकाळा येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रक व बैलगाडीचालक यांना रस्ता सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. मंगळवारी हा उपक्रम राबवण्यात आला. दरम्यान, नेहमीच हे जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जात आहेत. अनेक ठिकाणी बैलगाड्या व ट्रॅक्टरला रिफ्लेक्टरही अधिकाऱ्यांनी लावून दिले आहेत. या उपक्रमासाठी आरटीओ विजय काठोळे, एआरटीओ विजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक हनुमंत सुळे, अमोल राठोड यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ही जनजागृती राबवण्यात आली आहे.

वडीगोद्री मार्गाकडे जास्त कारखान्यांची संख्या असल्यामुळे या भागात विशेषकरून बैलगाड्या असल्यामुळे याबाबत जनजागृती केली जात आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून अपघातांबाबत माहिती जारी करण्यात आली आहे.

यात अपघातांमध्ये याच मार्गावर जास्त मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे या भागांतील वाहनचालक, ऊसतोड कामगार, पादचारी या नागरिकांमध्ये जनजागृती होण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. जनजागृतीच्या पुस्तकाचेही प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरटीओ विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.

रस्त्याच्या लेनचा वापर करा
वाहने चालवताना सावकाश चालवा, मोबाइलवर बोलू नका, हेल्मेट वापरा, रस्त्याच्या लेनचा वापर करा याविषयी जनजागृती केली जात आहे. आरटीओ विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक केले.

विद्यार्थ्यांमध्येही जनजागृती
विद्यार्थ्यांना रस्त्यांचे नियम, रस्त्यावरून जात असताना काय काळजी घेतली पाहिजे, कोणत्या दिशादर्शक फलकाचा काय अर्थ होतो, त्यासाठी काय पालन केले पाहिजे याची जनजागृती केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...